एनडीए सरकार आज, म्हणजेच मंगळवारी, 23 जुलै 2024 रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे.
अर्थसंकल्प कधी आणि कुठे सादर होणार?
अर्थसंकल्प संसदेत सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. याकडे सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठे उद्योजक सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी 3.0 सरकार आणि एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

अर्थसंकल्प कसा पाहता येईल?
तुम्ही अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपण खालील प्लॅटफॉर्मवर पाहू शकता:
- डीडी न्यूज: डीडी न्यूजवर थेट प्रक्षेपण पाहता येईल.
- डीडी नॅशनल: डीडी नॅशनलवरही थेट प्रक्षेपण असेल.
- डीडी न्यूज यूट्यूब चॅनेल: तुमच्या फोनवर डीडी न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह टेलिकास्ट पाहता येईल.
- संसद टीव्ही आणि दूरदर्शन: संसद टीव्ही आणि दूरदर्शनच्या YouTube चॅनेलवर थेट प्रवाह उपलब्ध असेल.
- वित्त मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट: वित्त मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवरही थेट प्रवाह पाहता येईल.
बजेट 2024 ची तारीख आणि वेळ
अर्थसंकल्प 2024-25 या आर्थिक वर्षाचा हा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जाणार आहे. तुम्हाला पाहायचा असेल तर Tv9 मराठीच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर टीव्ही लाईव्ह पाहू शकता.
महत्त्वाच्या घोषणांचे तपशील
केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणांचे सर्व तपशील सरकारद्वारे अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील. www.indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये बजेट दस्तऐवज पाहू शकता. हे PDF स्वरूपात उपलब्ध असतील, जे तुम्ही डाउनलोड, पाहू आणि वाचू शकता.
रेल्वे बजेटचा समावेश
मोदी सरकारने 28 फेब्रुवारी रोजी सादर होणारे बजेट आता 1 फेब्रुवारीला सादर करायला सुरुवात केली होती. स्वतंत्र रेल्वे बजेट बंद करून, त्याचा समावेश सर्वसाधारण बजेटमध्ये करण्यात आला. रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर करण्याची परंपरा संपुष्टात आणण्याची सूचना तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली होती.
हे ही वाचा – शरद पवार घेणार एकनाथ शिंदेंची भेट, कारण जाणून घ्या…