मंगळवारी शेअर बाजार जवळपास 80 हजाराच्या टप्प्यावर होता, पण बुधवारी बाजाराने मोठी झेप घेतली. आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने 80 हजार अंकांचा टप्पा पार केला.
सेन्सेक्सची मोठी उसळी
आज सकाळी बीएसई सेन्सेक्सने 481.44 अंकांनी उसळी घेतली. सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स 79,922.89 अंकांवर होता. काही मिनिटांतच सेन्सेक्स 572 अंकांनी वाढला आणि 80,000 अंकांचा टप्पा पार केला. गुंतवणूकदारांनी या उसळीमुळे आनंद व्यक्त केला.
कालचे संकेत, आजची कमाल
मंगळवारी सेन्सेक्स 80 हजारांच्या जवळ होता, पण दुपारनंतर तो मंदावला आणि 79,441.46 अंकांवर बंद झाला. बुधवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्सने 80,039.22 अंकांचा स्तर गाठला. निफ्टीनेही 18.10 अंकांनी घसरुन 24,123.85 अंकावर बंद झाला. मात्र, आज बाजार उघडल्यानंतरच 167 अंकांनी वाढून निफ्टीने 24,291 अंकांवर व्यापार सुरु केला.
बँकिंग स्टॉक्सचे योगदान
बीएसईच्या 30 शेअर्समध्ये 21 शेअर्स हिरव्या निशाणावर व्यापार करत होते. बँकिंग स्टॉक्सच्या उसळीमुळे सेन्सेक्स 80 हजाराच्या वर गेला. बँक निफ्टीने 53,000 अंकांचा रेकॉर्ड स्तर गाठला. HDFC बँक शेअर 2.9 टक्क्यांनी वाढून 1781.60 रुपयांवर, ICICI बँक शेअर 2 टक्क्यांनी वाढून 1215 रुपयांवर, आणि Axis बँक शेअर 2 टक्क्यांनी वाढून 1277.95 रुपयांवर पोहोचला. कोटक बँक शेअर 1.50 टक्क्यांनी वाढून 1799.90 रुपयांवर व्यापार करत होता.
निफ्टीची घौडदौड
सेन्सेक्स प्रमाणेच एनएसई निफ्टीनेही 167 अंकांनी उसळी घेतली. निफ्टीने 24,291 अंकांवर व्यापार सुरु केला आणि काही वेळातच 24,292 अंकांवर पोहोचला. बाजार उघडल्यानंतर 2095 शेअर्समध्ये तेजी आली, 694 शेअर्समध्ये घसरण झाली, तर 100 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसला नाही. निफ्टीवर HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC लाईफ, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, आणि टाटा कंझ्युमर हे गेनर ठरले.
शेअर बाजाराच्या या उच्चांकी स्तरामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
आजच्या बाजाराच्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. बँकिंग स्टॉक्समुळे सेन्सेक्सने 80 हजारांचा टप्पा पार केला आणि निफ्टीनेही उच्चांकी झेप घेतली. बाजारातील ही तेजी पुढील काही दिवस कायम राहील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा – विधान परिषद निवडणूक: पडद्यामागील हालचाली, बंडखोरी आणि क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी…