मोदींची गॅरंटी फसवी ठरली, जनतेचा विश्वास तुटला – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वासाला तडा गेला असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात आणि देशात मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाहीये, हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे, असे शरद पवार म्हणाले. मोदींची गॅरंटी खोटी निघाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

sharad pawar

भाजपची पिछेहाट आणि एनडीएचं सरकार

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठी पिछेहाट सहन करावी लागली. महाराष्ट्रातही भाजपची स्थिती कमजोर झाली आहे. केंद्रात भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही आणि एनडीएचं सरकार स्थापन करावं लागलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही सरकारचे कान टोचण्यात आले होते.

महाविकास आघाडीला चांगली कामगिरी

राज्यात महाविकास आघाडीला (मविआ) चांगली मत आणि जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मविआने 30-31 जागा जिंकल्या आहेत. विधानसभेच्या 288 जागांपैकी 155 मतदारसंघात विरोधकांना बहुमत मिळाले आहे. यावरून राज्यात लोकांचा मूड स्पष्ट झाल्याचे शरद पवारांनी नमूद केले.

sharad pawar

भुजबळांच्या वक्तव्याबद्दल शरद पवारांची प्रतिक्रिया

छगन भुजबळ यांच्या “मी राष्ट्रवादीसोबत आहे, अजित दादांसोबत नाही” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांना या विधानाबद्दल विचारण्यात आले असता, त्यांनी सांगितले की, त्यांच्या विधानामागची पार्श्वभूमी काय आहे हे मला माहीत नाही. माझी त्यांची वर्ष-सहा महिन्यांत भेट नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाबद्दल मला काही माहीत नाही.

भुजबळांचा पुढचा पाऊल

आधी लोकसभा नंतर राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. भुजबळांचं पुढचं पाऊल काय असेल याबद्दल तर्क-वितर्क सुरू आहेत.

शरद पवारांनी केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि मोदी सरकारबद्दल लोकांचा विश्वास कमी झाल्याचे त्यांचे मत आहे. पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हे ही वाचा – विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा ‘काय झाडी, काय डोंगर..’ : क्रॉस वोटिंगची भीती

Leave a Comment