Sanjay Raut Attack : इव्हीएममध्ये फेरफार शक्य असलेल्या देशात… संजय राऊत यांचा बीफ प्रकरणात गंभीर आरोप

नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात विरोधकांनी भाजपला जोरदार टार्गेट केले आहे. या प्रकरणात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव चर्चेत आले असून, त्यांना वाचवण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. यासोबतच बीफ प्रकरणावरून देखील विरोधकांनी भाजपला धारेवर धरले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

संकेत बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप

हिट अँड रन प्रकरणात संकेत बावनकुळे यांच्यावर आरोप झाले असून, विरोधकांनी पोलिसांवर बावनकुळे यांना वाचवण्याचा आरोप लावला आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, “भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना आता कौटुंबिक यातना काय असतात, हे समजेल.” याआधी भाजपने विरोधकांच्या कुटुंबांवर खोटे आरोप लावून त्रास दिला असल्याचं त्यांनी नमूद केलं.

Sanjay Raut Attack

बीफ प्रकरणावरूनही विरोधकांचा हल्ला

हिट अँड रन प्रकरणातील गाडीत बीफचे बिल सापडल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. या बिलाच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय राऊत म्हणाले, “त्या गाडीत बीफचं बिल सापडल्याचं सोशल मीडियावर चर्चा आहे, पण पोलिसांना बिल जप्त करायला चार दिवस का लागले?” त्यांनी हे देखील विचारले की, “गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आली होती, तरीही याबाबत पोलीस स्पष्ट बोलत नाहीत. याचा तपास नीट होत नाही, अशी लोकांमध्ये भावना आहे.”

ईव्हीएमवरूनही टोला

संजय राऊत यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) वरूनही भाजपवर टीका केली. ते म्हणाले, “ज्या देशात ईव्हीएममध्ये मतं बदलली जाऊ शकतात, त्या देशात काहीही होऊ शकतं.” त्यांनी बीफ प्रकरणातील बिलावर संशय व्यक्त केला आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.

विरोधकांची मागणी

विरोधकांनी या प्रकरणात संपूर्ण पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. त्यांच्यामते पोलिसांनी काही गोष्टींवरून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. बीफ प्रकरण, गाडीची नंबर प्लेट बदलणे, आणि बिल जप्त करण्यास लागलेला वेळ या सर्व मुद्द्यांवर विरोधकांचा रोष आहे.


हे ही वाचा – Kieron Pollard : फक्त सिक्स मारत कायरन पोलार्डने 19 चेंडूत जिंकली मॅच!

Leave a Comment