राज्यातील मुलींसाठी सरकारने जाहीर केलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘लेक लाडकी’ योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळावा, तसेच त्यांच्या भविष्यासाठी एक सुरक्षित रक्कम साठवली जावी, हा सरकारचा उद्देश आहे. या योजनेनुसार मुलीला जन्मापासून 18 वर्षांच्या वयापर्यंत विविध टप्प्यांवर एकूण 1 लाख 1 हजार रुपये दिले जातात. या योजनेच्या तपशीलांची आणि त्यासाठी आवश्यक अटींची माहिती खाली दिली आहे.

‘लेक लाडकी’ योजनेची ओळख
राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यापैकीच ‘लेक लाडकी’ ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते. 1 एप्रिल 2023 नंतर पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू आहे.
कोणत्या टप्प्यावर किती रक्कम मिळेल?
- जन्मानंतर पहिला टप्पा: मुलगी जन्माला आल्यावर कुटुंबाला 5,000 रुपये दिले जातील.
- शाळेत प्रवेश: मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये मिळतील.
- सहावीत प्रवेश: सहावीत प्रवेश घेतल्यावर 7,000 रुपये दिले जातील.
- अकरावीत प्रवेश: अकरावीत गेल्यावर 8,000 रुपये मिळतील.
- वय 18 पूर्ण झाल्यावर: मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये एकरकमी दिले जातील.
‘लेक लाडकी’ योजनेच्या अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
- मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतरचा असावा.
- कुटुंबाचे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असणे आवश्यक आहे.
- कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
अर्ज कसा करावा?
‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. इच्छुक पालक आपल्या जवळच्या अंगणवाडीत जाऊन अर्ज करू शकतात. अर्जात वैयक्तिक माहिती, मोबाईल नंबर, रहिवासी पत्ता, मुलीची माहिती, आणि बँक खात्याची माहिती भरावी लागेल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज करताना खालील कागदपत्रे जमा करावी लागतील:
- मुलीचा जन्मदाखला
- कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र
- पालकांचे आधारकार्ड
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी)
- मतदार ओळखपत्र
- शाळेचा दाखला
- अंतिम लाभासाठी मुलगी अविवाहित असावी
‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घ्या
‘लेक लाडकी’ योजना मुलींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी हा आर्थिक आधार मिळवण्यासाठी सर्व पात्र कुटुंबांनी अर्ज करावा. राज्य सरकारची ही योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठे पाऊल आहे.
हे ही वाचा – Mumbai Hit & Run Case – मुंबईत पुन्हा हिट अँड रन: अल्पवयीनाने SUVने चिरडले, दुर्दैवी मृत्यूमुळे शहरात खळबळ