Mumbai Local – मध्य रेल्वे पुन्हा ठप्प; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल रेल्वे सेवा सध्या विस्कळीत झाली आहे. कळवा रेल्वे स्थानकात एका एक्सप्रेस गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तांत्रिक बिघाडामुळे मोठा खोळंबा

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही गाडी कळवा स्थानकात थांबवण्यात आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, या मार्गावरील सर्व लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. या बिघाडामुळे कल्याण, कर्जत येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

Mumbai Local

तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम सुरू

लातूर एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. बिघाड दुरुस्त झाल्यानंतर एक्सप्रेस गाडी पुढे रवाना होणार आहे. मात्र, या गोंधळामुळे मुंबईतील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

चाकरमान्यांचे हाल

या तांत्रिक बिघाडामुळे आणि त्यातून झालेल्या विलंबामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक चाकरमानी आणि विद्यार्थी आपल्या ऑफिसेस आणि शाळा-कॉलेजला जाण्यासाठी वेळेवर पोहोचू शकणार नाहीत. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या संतापाला वाचा फुटली असून, स्थानकांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण

सकाळच्या वेळी लाखो नागरिक मुंबई लोकलने प्रवास करून ऑफिसेस किंवा शाळा-कॉलेज गाठतात. मात्र, अचानक झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालये गाठण्यासाठी प्रवाशांची होणारी कसरत पाहता संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टेशनवरही मोठी गर्दी जमा झाल्याने प्रवाशांना एकमेकांवर धक्का-मुक्की करावी लागत आहे.

मुंबई लोकल उशिराने धावल्याने होणाऱ्या अडचणी

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास मोठा आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे त्यांची वेळ वाया जात आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत.


हे ही वाचा – Sharad Pawar on Womens Oppression : महिला अत्याचारावर शरद पवार आक्रमक; शिवछत्रपतींच्या हात कलम करण्याच्या उदाहरणाचा दिला दाखला

Leave a Comment